पिंपरी-चिंचवड

‘वंडरफेस्ट’मधून विज्ञानाची आनंदसफर

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ : रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कागदातून कलानिर्मिती आणि थरारक वॉटर रॉकेट शो अशा विविध उपक्रमांतून विज्ञान अनुभवण्याची संधी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क अँड प्लॅनेटेरियममध्ये उपलब्ध झाली आहे. बालदिनानिमित्त आयोजित ‘वंडरफेस्ट’ या दोनदिवसीय महोत्सवाची संकल्पना ‘बचपन-सीमांच्या पलीकडे’ अशी आहे. रविवारपर्यंत (ता. १५) हा महोत्सव चालणार आहे.
मुलांमधील कुतूहल, कल्पनाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि मनोरंजनाची सांगड घालण्यात आली आहे. रोबोटिक्स व एआय कोडिंग कार्यशाळेतून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. ‘पेपर प्ले लॅब’मध्ये कागदाच्या घड्यांतून कलाकृती, तर ‘पेपरट्रॉनिक’ कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्सचे प्रयोग करण्याची संधी आहे. चित्रकला स्पर्धेतूनही मुलांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळत आहे.
‘द सायन्स स्पेक्टॅकल’, ‘खेळा आणि जिंका’, जादूचे खेळ, सोलर सफारी, कराओके आणि आकाश निरीक्षण हे उपक्रम आकर्षण ठरत आहेत. थ्रीडी थिएटर व तारांगणातील विशेष कार्यक्रमांचाही समावेश आहे. ‘सायझिंग ऑफ द स्पेस’मधून विशाल विश्वाची सफर अनुभवता येत आहे. बालकांसह पालकांनाही सहभागी होता येणार आहे. अनुभवाधारित शिक्षणातून विज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्यावर भर आहे.
--
मुलांनी निर्भयपणे प्रयोग करावेत, प्रश्न विचारावेत आणि नव्या शक्यता शोधाव्यात. मोठ्यांनाही शोधाचा आनंद मिळावा, असा प्रयत्न आहे.
- प्रवीण तुपे, संचालक, सायन्स पार्क अँड प्लॅनेटेरियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

Latest Marathi News Live Update: मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी केदार दिघेंचा पोलिसांना सवाल

SCROLL FOR NEXT