पिंपरी-चिंचवड

शाळा सुरू होऊनही बस पासची प्रतीक्षा

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ ः शाळा सुरू होऊन एक आठवडा उलटूनही विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस पासचे वितरण झालेले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड पडत आहे.
पालक, विद्यार्थी पास केंद्रावर रोज हेलपाटे मारत आहेत. पण, महापालिकेने मान्यता दिली नसल्याने पास देता येणार नसल्याचे पास केंद्रावरील कर्मचारी सांगत आहेत.
‘पीएमपीएमएल’ने मे महिन्यातच महापालिकेकडे प्रस्ताव पाठवला. तो १७ जून रोजी माध्यमिक विभागाला मिळाला. उपलेखापालांनी तो १९ जून रोजी उपायुक्त ममता शिंदे यांच्याकडे पाठवला. तीन दिवस होऊनही त्यांची मान्यता मिळालेली नाही. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त, आयुक्त आणि स्थायी समितीच्या मान्यता असे टप्पे असतील. मग प्रस्ताव ‘पीएमपीएमएल’कडे आल्यानंतरच पास वितरण सुरू होईल.
-------
मी आकुर्डीतील खासगी शाळेत जातो. बस पाससाठी मी दोन वेळेस निगडी पास केंद्रावर गेलो होतो. पण, पास वितरण सुरू झालेले नाही असे सांगण्यात आले.
- अजिंक्य शेळके, विद्यार्थी

संबंधित प्रस्तावाची फाईल तयार झाली आहे. त्यात काही त्रुटी होत्या. त्याची पूर्तता करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
- ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT