पिंपरी-चिंचवड

उड्डाणपूल असूनही रक्षक चौक जाम

CD

पिंपरी, ता. २४ ः औंध-रावेत बीआरटी मार्गावर पिंपळे निलख येथील रक्षक चौकात भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारला आहे. गेल्या महिन्यात तो रहदारीसाठी सुरू केला. तरीही वारंवार विशेषतः सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा मनस्ताप वाहनचालकांसह प्रवाशांना होत आहे. पिंपळे निलखकडून पुण्याकडे जाण्यासाठी आणि लष्करी कार्यालयाकडून पिंपळे निलख, वाकड, रावेतकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा तर, औंध, सांगवी आणि वाकड, हिंजवडी, काळेवाडी फाटा, थेरगाव, रावेतकडे जाण्यासाठी पुलाचा वापर केला जात आहे. मात्र, पुलाचा तीव्र उतार आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा वाहतूक मंदावून कोंडीही होते. विशेषतः चौकातील कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारला आहे. तरीही समस्या सुटली नसल्याचे दररोजच्या कोंडीतून दिसून येत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसह पोलिसांनी सकाळी व सायंकाळी वाहतूक नियमन करणे गरजेचे आहे. पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने वेगमर्यादा निश्चित केली आहे. अनेकदा त्याचाही भंग काही वाहनचालकांकडून होत असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT