पिंपरी, ता. २५ : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांदरम्यान मेट्रो धावत आहे. पण, या प्रवासादरम्यान कोचमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव आसन व्यवस्था उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘दिव्यांगजन हक्क अधिनियम-२०१६’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दिव्यांग प्रवाशांनी केली आहे.
मेट्रोचे पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या मार्गांवर दररोज सरासरी दोन लाख नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत. यात दिव्यांग बांधवांचीही संख्या मोठी आहे. पण, पहिला टप्पा पूर्ण क्षमतेने सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरी अजूनही मेट्रोमध्ये दिव्यांगांना राखीव जागेची तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी, दिव्यांगांना अडचणी येत आहेत.
मेट्रोच्या सर्व कोचमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, दिव्यांगांसाठी अजूनही राखीव जागेची तरतूद करण्यात आलेली नाही, असे या प्रवाशांनी सांगितले.
दिव्यांग प्रवाशांच्या मागण्या
- मेट्रो कोचमधील व्हीलचेअरसाठी आरक्षित जागेशेजारचे दोन्ही बाक दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव ठेवावेत
- व्हीलचेअरसाठी आरक्षित जागा असलेला कोच मेट्रो स्टेशनवर जेथे थांबतो, त्या जागेवर अद्याप दिशादर्शक फलक नाहीत. ते तत्काळ लावावेत
काय आहे नियम?
दिव्यांगजन हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ४० व ४१ नुसार (सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुलभता) केंद्र आणि राज्य सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक साधने (बस, ट्रेन, मेट्रो इत्यादी) दिव्यांगांसाठी पूर्णपणे सुलभ करणे बंधनकारक आहे. कलम १५ (वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे नियम) नुसार सर्व सार्वजनिक उपक्रमांनी दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव जागांचे चिन्हांकन अशा ठिकाणी करावे, की जे दुरूनही ठळकपणे दिसतील.
मेट्रो प्रवासात दिव्यांगांना जागेसाठी झगडावे लागत आहे. काही प्रवासी मोबाइल पाहण्यात व्यस्त असतात. शेजारी उभा असलेला प्रवासी दिव्यांग आहे, हे त्यांना लक्षात येत नाही. कधीतरी कोणीतरी दया दाखवून बसायला जागा देते. पण, दिव्यांग प्रवाशांना हक्क हवा आहे.
- मयुर सूर्यवंशी, प्रवासी, चिंचवड
मेट्रोचा प्रवास सहज होण्यासाठी दिव्यांग बांधवांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू.
- श्रावण हार्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.