पिंपरी-चिंचवड

‘जगण्याला अर्थ देण्याचे वारकरी संप्रदायात सामर्थ्य’

CD

निगडी, ता.२५ ः ‘‘समाजात अनेक जण रडतकढत जगत आहेत. पण, वारकरी संप्रदायामध्ये हा आनंद वेगळा आहे. जगण्याला अर्थ देण्याचे सामर्थ्य संप्रदायात आहे,’’ असे प्रतिपादन कीर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
यमुनानगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या तृतीय वर्धापन दिन सोहळा, कलशारोहण समारंभ, गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात काल्याच्या कीर्तनामध्ये शेवाळे महाराज बोलत होते. यावेळी महापौर रवी लांडगे, भाऊसाहेब भोईर, अभिषेक बारणे, मंदिराच्या संस्थापिका नगरसेविका सुलभा उबाळे, राम उबाळे, मंदिर विश्वस्त अंकुश जगदाळे, शशीकिरण गवळी, कार्याध्यक्ष तुकाराम वारंग यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
शेवाळे महाराज म्हणाले, ‘‘चांगल्या कामाचे फळ कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळतच राहते. आपली सत्ता सर्वत्र असावी, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, सर्वांची सत्ता चालत नाही. एकाची सत्ता चालते.’’
यावेळी समारंभासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, परिसरातून कलशाची मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Innovation Mahakumbh 2.0 : पुण्यात होणार इनोव्हेशन महाकुंभ २.०! एसएनडीटीतील १११ विद्यार्थ‍िंनी मांडणार स्टार्टपच्या नवसंकल्पना

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

SCROLL FOR NEXT