पिंपरी, ता. २५ ः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण या संदर्भातील प्रस्तावांना स्थायी समिती सभेने मंजुरी दिली.
शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध कामांना मान्यता देण्यात आली. दिघी, बोपखेल परिसरातील मलनिस्सारण नलिकांमध्ये सुधारणा करणे; दापोडीमध्ये जलनिस्सारण वाहिनीचे उन्नतीकरण करणे; मामुर्डी साईनगर उंच जलकुंभ व वाहिन्या टाकणे; पुनावळेत अग्निशमन केंद्र उभारणे; जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, प्रशासकीय इमारतींमधील अग्निशामक यंत्रणांची देखभाल- दुरुस्ती करणे; सोनोग्राफी यंत्रणा दुरुस्ती; यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील १४ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे वार्षिक मान्यतेसाठी शुल्क अदा करणे; विद्युत विषयक कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे; विद्युत वाहिन्या देखभाल-दुरुस्ती आदी कामांना मंजुरी दिली.
महत्त्वाचे अन्य मंजूर विषय
- महापालिकेच्या चिखलीतील शाळा क्रमांक ९० व २१ ची दुरुस्ती
- कोयनानगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण
- मुख्य प्रशासकीय इमारतीतील दुरुस्ती, सभागृह नूतनीकरण
- अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती
- दिघी-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्यांची साफसफाई
- क्रीडा साहित्य खरेदी, अभिव्यक्ती कलामहोत्सव खर्चास मान्यता
- डेंगी प्रतिबंधासाठी धुरीकरण, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता
इलेक्ट्रिक वाहन धोरण
शहरातील वाढते प्रदूषण कमी करणे आणि इंधनावरील खर्च मर्यादित ठेवणे या उद्देशातून महापालिकेच्या वाहनव्यवस्थेत पर्यावरणपूरक बदल घडवून आणायचे आहेत. त्याअंतर्गत महापौर, आयुक्त, क्षेत्रीय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण निश्चित केले आहे. याद्वारे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला जाणार आहे. यामुळे ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती स्थायी सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.