‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिन’ विशेष
पिंपरी, ता. ३ : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार मार्च १९६६ रोजी नॅशनल सेफ्टी कौन्सिलची (एनएससी) स्थापना केली. या पार्श्वभूमीवर १९७२ पासून दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा याचे ५५ वे वर्ष आहे. ‘सक्रिय सहभाग, शिक्षण आणि सक्षमीकरण’ ही या वर्षीची संकल्पना आहे.
‘‘शहरालगत चाकण, भोसरी आणि तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र आहे. या क्षेत्रांत दररोज अपघात घडतात. अशा वेळी काळजी न घेतल्यामुळे कामगार गंभीर किंवा किरकोळ जखमी होत असून काही घटनांमध्ये कामगारांचा मृत्यूही झाला आहे. हे रोखण्यासाठी कारखान्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई) अनिवार्य वापर, सुरक्षा प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणी आणि आपत्कालीन नियमावलीची अंमलबजावणी या नियमांचे पालन केले पाहिजे. उद्योग प्रगतीचे प्रवेशद्वार आहे, परंतु सुरक्षा हा त्याचा खरा पाया आहे,’’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. उद्योगनगरी असूनही पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी एकही स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले.
औद्योगिक परिसरातील दुर्घटना (कंसात दिवस)
- भोसरी येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत आठ महिलांचा मृत्यू (२७ ऑगस्ट २००८)
- चिखलीमधील हार्डवेअरच्या कंपनीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू (३० ऑगस्ट २०२३)
- तळवडे येथील स्पार्कल कॅण्डलच्या कंपनीतील स्फोट, आगीत चौदा महिलांचा मृत्यू (८ डिसेंबर २०२३)
कंपन्यांमधील अग्निशमन उपकरणांची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती व्हावी. दर सहा महिन्यांनी फॉर्म-बी सादर करणे आवश्यक आहे. कामगारांना अग्निशमन उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.
- भारत कापसे, विभागीय अग्निशमन अधिकारी, पुणे
पिंपरी चिंचवड एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. यासाठी जागाही राखीव आहे. गेल्या वर्षी निविदा निघाल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघू उद्योजक संघटना
कामगारांनी सुरक्षा साधने वापरावीत. कंपनीत काम सुरू करण्यापूर्वी ते वापरत असलेले यंत्र योग्य पद्धतीने सुरू आहे का, हे तपासले पाहिजे. नंतरच काम सुरू केले पाहिजे.
- विश्वास पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा विभाग, ‘फौरशिया इंडिया’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.