पिंपरी-चिंचवड

साळुंब्रे पूल मद्यपींचा अड्डा

CD

सोमाटणे, ता.५ ः नवीन पुलामुळे पाच दशके दळणवळण सेवा देणारा साळुंब्रे पूल इतिहास जमा झाला असून या बंद पुलाचा वापर मद्यपींनी सुरू केला आहे.
पवना धरणाचे काम १९७५ मध्ये पूर्ण होऊन पाणी साठवणे सुरू करण्यात आल्यानंतर साळुंब्रे - गहुंजे गावांच्या दळणवळणासाठी पवना नदीपात्रात सिमेंटच्या नलिका बसवून त्यावर दगडगोटे, मुरुम टाकून साकव (पूल) बांधण्यात आला होता. याच साकव पुलावरुन गेले पाच दशके पावसाळा वगळता उर्वरीत काळात रहदारी सुरू होती. पावसाळ्यातही दळणवळण सेवा सुरू राहण्यासाठी येथे नवीन पूल बांधावा, अशी नागरिकांची अनेक दिवसाची मागणी होती. अखेर या मागणीचा विचार करुन पाटबंधारे विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आर्थिक मदतीतून गेल्या वर्षी पवना नदीवर गहुंजे नजीक नवीन पूल बांधला. या नवीन पुलाच्या बांधणीनंतर पूर्वीचा जुना साळुंब्रे साकव पूल वाहतुकीसाठी बंद होऊन इतिहास जमा झाला. हा साकव बंद झाल्याचा गैरफायदा घेत शहरी भागांतील अनेक मद्यपींनी येथे हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, मासेमारांनीही सध्या निर्मनुष्य असलेल्या जुन्या साकव पुलाचा वापर सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT