सोमाटणे, ता. ६ : नवीन पूल बांधण्यात आल्याने गेली पाच दशके दळणवळणाची सेवा देणारा साळुंब्रे येथील साकव पूल आता इतिहासजमा झाला आहे. वाहतुकीसाठी बंद झालेल्या या जुन्या पुलाचा सध्या मद्यपींकडून वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
पवना धरणाचे काम १९७५ मध्ये पूर्ण होऊन पाणीसाठा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साळुंब्रे आणि गहुंजे गावांच्या दळणवळणासाठी पवना नदीपात्रात सिमेंटचे पाइप बसवून त्यावर दगडगोटे आणि मुरूम टाकून साकव पूल बांधण्यात आला होता. या साकव पुलावरून गेली पाच दशके पावसाळा वगळता उर्वरित काळात वाहनांची वाहतूक सुरू होती.
पावसाळ्यातही दळणवळणाची सेवा सुरळीत राहावी, यासाठी या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर या मागणीचा विचार करून पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक मदतीतून गेल्या वर्षी पवना नदीवर गहुंजेजवळ नवीन पूल बांधला. नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर पूर्वीचा साळुंब्रे येथील साकव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पाच दशकांहून अधिक काळ दळणवळणाची सेवा देणारा हा पूल आता इतिहासजमा झाला आहे. दरम्यान, साकव पूल बंद झाल्याचा फायदा घेत शहरी भागातील अनेक मासेमारी करणारे नागरिक तसेच मद्यपी येथे येत आहेत. सध्या हा परिसर निर्मनुष्य असल्याने जुन्या साकव पुलाचा वापर मद्यपींकडून केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला असून, संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
फोटो : साळुंब्रे येथील वाहतुकीसाठी बंद झालेला जुना साकव पूल.
Smt5Sf1.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.