पिंपरी-चिंचवड

‘हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स’कडून कळसुबाई शिखर सर

CD

पिंपरी, ता. ६ : हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशनच्या २० शिलेदारांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईवर (१६४६ मीटर) यशस्वी चढाई केली. थंडी, दाट धुके आणि खडतर चढण पार करत या ट्रेकर्सनी शिखरावर ‘हर हर महादेव’चा नामघोष केला.
या मोहिमेत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गजानन खैरे, मध्य प्रदेशातील गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रशांत खैरे, भारत फोर्जमधील अधिकारी दत्तात्रय कदम, पोलिस अधिकारी श्रीरंग निगडे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, उद्योजक सुदेश कोलते, पुणे जिल्हा परिषदचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, टाटा मोटर्समधील अधिकारी संजय कदम, बजाज ऑटोमधील अधिकारी युवराज जगताप, सहाय्यक वनसंरक्षक नितीश निगडे, ॲड. शुभम कदम, अनुज खैरे, अभिषेक जगताप, चालुक्य खैरे, दिशा खैरे, राजवर्धन खैरे तसेच महिलांमध्ये वैशाली कदम, वंदना कदम आणि रजनी खैरे यांनी सहभाग घेतला. संस्थेचे प्रमुख विश्वस्त उद्योजक देवानंद कदम यांनी या मोहिमेचे नियोजन केले.
यावेळी गजानन खैरे म्हणाले, ‘‘कळसुबाई म्हणजे फक्त ट्रेक नसून ती एक साधना आहे. ही संस्था महाराष्ट्राच्या कणखर सह्याद्रीची ओळख नव्या पिढीला करून देत आहे. संस्थेच्या वतीने लवकरच पुढील मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून, निसर्गप्रेमींनी यात सहभागी व्हावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT