पिंपरी-चिंचवड

कसलेल्या अभिनेत्याचे मौलिक विचार

CD

नाना पाटेकर यांनी १९ जानेवारी २०१६ ला पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित चौदाव्या विस्तारित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्‌घाटन चिंचवडमधील बिग सिनेमा येथे केले होते. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण रसिकांना आजही आठवते.

‘‘अभिनय करायचा नसतो, तर ती एक अनुभूती असते. नटसम्राट चित्रपट करताना माझ्यातील अनुभवांचे गाठोडे असलेली अनुभूती आता पूर्ण रिती झाली आहे. ‘नटसम्राट’ ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या कामातून आपल्याला मरेपर्यंत जगण्यासाठी एक कारण मिळाले आहे. मकरंद अनासपुरे यांच्यामुळे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यातून आपल्याला शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या आणि नट म्हणून काहीतरी गवसले. आपला पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे. आपले दुःख पराकोटीला जाते, तेथे शेतकऱ्याचे सुरू होते. त्यामुळे त्याचे दुःख आपल्याला आपले वाटले पाहिजे. पगारात गेल्या कित्येक वर्षांत मोठी वाढ झाली. सोन्या-चांदीसह जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव काहीपट झाले. मात्र, त्या तुलनेत शेतमालाचा उत्पादन खर्च हा मिळकतीपेक्षा जास्तच आहे. म्हणून तो दुःखी आहे. त्याचे दुःख आपण वाटून घेऊया. म्हणजे ते काहीसे कमी होईल. माझ्यादृष्टीने ते आतापर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारापेक्षा महत्त्वाचे व मोठे आहे,’’ अशा शब्दांत नानांनी आपले मौलिक विचार रसिकांसमोर मांडले होते.

PNE26W56206

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

SCROLL FOR NEXT