पिंपरी-चिंचवड

अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

CD

पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या भागात वाहनांची संख्या आणि वाहतुकीची वर्दळ वाढत असताना अपघातांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे. भरधाव वेग, अवजड वाहनांची वर्दळ, चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणारे पादचारी आदी कारणांमुळे काही ठिकाणे वारंवार अपघातांची केंद्रे ठरली आहेत. त्यामुळे अशा ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी तातडीच्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’वर २०२३ ते २०२५ दरम्यान झालेल्या अपघातांत १३८ जणांचा मृत्यू झाला असून २७४ गंभीर जखमी झाले आहेत. या यादीत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील जुना मुंबई-पुणे महामार्ग, नाशिक महामार्ग, तळेगाव-शिक्रापूर मार्ग यासह इतर मार्गांवरील ठिकाणांचा समावेश आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांची यादी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखाही निश्चित करीत आहे. या अपघातस्थळी विविध उपाययोजना राबविण्यात भर दिला जात आहे.
-----------------------------------

अपघातांची प्रमुख कारणे

- रस्त्यांची रचना आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी
- अतिवेगाने, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे
- अवजड वाहनांची भरधाव वाहतूक
- रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग
- अपुऱ्या पथदिव्यांमुळे रात्रीची कमी दृश्यमानता
- धोकादायक वळणांवर योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव
- पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंगची कमतरता
- सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि लेन मार्किंगचा अभाव
- रस्त्यावर अचानक येणारे यू-टर्न
- दुचाकीस्वारांकडून हेल्मेट व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
- खराब रस्ते
----------------------------

‘ब्लॅक स्पॉट’वरील दुर्घटना (कालावधी २०२३ ते २०२५)
ठिकाण मृत्यू गंभीर जखमी
तळेगाव चौक, चाकण १६ १९
चिंबळी फाटा १२ १७
कुरुळी फाटा ९ १५
सेंट्रल चौक, देहूरोड ५ २०
आंबेठाण चौक ५ १८
मुटकेवाडी कॉर्नर, चाकण ७ १५
स्पायसर चौक, चाकण ७ १५
एचपी चौक, म्हाळुंगे ६ १७
आळंदी फाटा, नाशिक महामार्ग ७ ११
धावडे वस्ती, भोसरी ७ १२
चिंचवड चौक, जुना पुणे-मुंबई महामार्ग ५ १८
संविधान चौक, भोसरी ३ १५
भारत माता चौक, मोशी ८ ७
मेदनकरवाडी फाटा, चाकण ६ १७
के.ई. मार्टसमोर, नाशिक महामार्ग २ १५
इंद्रायणी हॉटेलसमोर, तळेगाव दाभाडे ८ ७
तिरंगा हॉटेलजवळ, कडाचीवाडी, चाकण ७ १३
फुगेवाडी चौक ७ ८
माय कार शोरूम, नाशिक महामार्ग ७ ६
साईनाथ हॉस्पिटल समोर, भोसरी ४ ९
-----------------------
एकूण १३८ २७४
------------
अपघाताच्या ठिकाणी विविध उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. वाहतूक नियमनासाठी जादा मनुष्यबळ नेमणे, तसेच सिग्नल, रस्ते दुरुस्ती यांसह रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.
- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड
---

वाहतूक पोलिसांनी उचललेली पावले
- चौकातील सिग्नलची वेळ वाढवली
- नाशिक महामार्गावरील अनधिकृत रोड क्रॉसिंग पॉईंटची संख्या कमी करून रस्ता दुभाजकाची उंची वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (एनएचएआय) पत्रव्यवहार
- रस्त्यालगत थांबलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
- वाहतूक बंदीच्या काळात रस्त्यावर धावणाऱ्या जड, अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई
- महामार्गावर गस्तीसाठी पथके नेमून अतिक्रमण हटवले
- रस्त्याच्या बाजूला सूचना फलक
- सेवा रस्त्याचे रुंदीकरण करून त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पाठपुरावा
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT