पिंपरी-चिंचवड

परवडणाऱ्या घरांचा दर्जा उंचावणार!

CD

पिंपरी, ता. १० : सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘नागपूर पॅटर्न’ राबविण्याचा विचार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करीत आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा (पीपीपी) पर्याय तपासण्यात येत आहे.
या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार घरे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्राधिकरणाचा निधी दीर्घकाळ प्रकल्पांमध्ये अडकून पडणार नाही, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ‘पीएमआरडीए’ने सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारल्यानंतर तेथील बांधकामाचा दर्जा, पाणीपुरवठा आणि अन्य सुविधांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्याची दखल घेत तत्कालीन आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. तसेच, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) यांच्याकडून प्रकल्पाची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे हा गृहप्रकल्प चर्चेत आला होता.
या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी ‘नागपूर पॅटर्न’चा अभ्यास केला जात आहे. या मॉडेलच्या माध्यमातून गृहप्रकल्पांची उभारणी अधिक दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
भविष्यात ‘पीएमआरडीए’च्या गृहप्रकल्पांसह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्येही या मॉडेलचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्वनिधीवर आधारित प्रकल्प, सार्वजनिक हिताला प्राधान्य देणारे मॉडेल आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीचे विविध पर्याय तपासले जात आहेत. हे मॉडेल प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात कितपत उपयुक्त ठरेल, याचा अभ्यास सुरू आहे. प्रकल्पाची कार्यपद्धती, प्रत्यक्ष अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार्यता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा विचार करून योग्य मॉडेल निश्चित केले जाणार आहे.

लाभार्थ्यांना दर्जेदार सुविधा
नव्या पॅटर्नमुळे लाभार्थ्यांना दर्जेदार सदनिका, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच कर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम व्यावसायिकांवर बांधकामाचा दर्जा, भविष्यातील तक्रारींचे निराकरण आणि देखभालीची जबाबदारी दिली जाईल.
---
काय होणार?

- जमिनीचे दर निश्चित ठेवण्यावर भर
- लाभार्थ्यांना कर्ज व अन्य सुविधांसाठी सुलभ व्यवस्था
- प्रकल्पावरील खर्च आणि वेळ कमी करण्याचा प्रयत्न
- बांधकामाची गुणवत्ता आणि सदनिकांचा दर्जा सुधारणार
- परवडणाऱ्या दरात दर्जेदार घरे उपलब्ध होण्याची अपेक्षा
- विधानसभा मतदारसंघनिहाय गृहप्रकल्पांचे नियोजन करण्याचा विचार
---
गृहनिर्माण प्रकल्पांचा अनुभव, कार्यपद्धती आणि त्यातील प्रभावी बाबींचा अभ्यास सुरू आहे. भविष्यात यापैकी काही मॉडेलचा वापर करता येईल का, याबाबत अभ्यासाअंती निर्णय घेतला जाईल.
- अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT