पिंपरी-चिंचवड

नवरात्राचे उपवास करताय? काळजी घ्या!

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः नवरात्रात शक्तीच्या उपासनेमध्ये नऊ दिवस उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रद्धेच्या भरात अनेक जण कडक उपवास करतात खरे, पण नऊ दिवसांत बदलत्या हवामानामुळे शरीराची ऊर्जा कमी होण्याचा धोकाही असतो. ‘उपवास’ हा आरोग्यासाठी ‘वरदान’ की ‘शाप’ ठरणार, हे या काळात काय खातो यावर
ठरते. भक्तीसोबत शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
या काळात महिलांसह पुरुषही नऊ दिवस उपवास करतात. उपवासामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची (डिटॉक्स) उत्तम संधी असते. मात्र, अनेकदा उपवासामुळे जड, वातूळ आणि तळलेले पदार्थ खाण्याची पद्धत रूढ झाली आहे. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते आणि आम्लपित्त, सुस्ती यांसारखे त्रास डोके वर काढतात.

या गोष्टी लक्षात ठेवा
- धार्मिक भावना जपायची असली तरी जीवाला त्रास होईल असा उपवास नको
- निर्जल, काहीही न खाणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपते याचा अंदाज घ्या
- दिवसभर काहीही न खाता रात्री एकदम जड जेवल्याने पचनक्रिया बिघडते
- दर तीन ते चार तासांनी थोडे-थोडे पौष्टिक पदार्थ खाणे उपयुक्त
- मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा समस्या अनेक वर्षांपासून असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊनच उपवास करा
- गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कडक उपवास करू नये
-----
कोणते पदार्थ टाळावेत?
उपवास म्हणजे साधारणपणे साबूदाणा, बटाटा, दाणे असे वातूळ पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात; पण पावसाळ्यात आधीच पचनशक्ती क्षीण झालेली असते. त्यात गॅसेसचा त्रास होत असेल तर वातूळ पदार्थांचे प्रमाण कमी राहील असे पाहावे. उपवासाला अनेकदा तळलेले वडे, चिवडा, पापड्या, वेफर्स असेही खाल्ले जाते; पण आपल्याला खोकला झाला असेल तर असे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो या गोष्टी घरात तळून खाव्यात, कारण बाहेर कशा प्रकारचे तूप, तेल वापरतात आपल्याला माहीत नसते.
---------
कोणते पदार्थ खावेत?
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन ः उपवासात अन्न कमी खाल्ले जात असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे शहाळ्याचे पाणी (नारळपाणी), ताक, लिंबू पाणी किंवा ताज्या फळांचा रस घ्यावा. हे द्रव पदार्थ शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि चेहऱ्यावरील सतेजता टिकवून ठेवतात.
पौष्टिक धान्यांचा समावेश ः नेहमीचा साबूदाणा पचायला जड असतो. त्याऐवजी वरीचे तांदूळ (भगर) आणि राजगिरा यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. राजगिऱ्याचे लाडू किंवा भगरीची खिचडी शरीराला थकवा जाणवू देत नाही.
दुग्धजन्य पदार्थ आणि फळे ः नऊ दिवस रोज वेगवेगळी ताजी फळे जसे की सफरचंद, डाळिंब, पपई, केळी खावीत. तसेच दुग्धजन्य पदार्थ जसे की ताजे दही, पनीर आणि दूध यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला कॅल्शियम मिळते आणि स्नायू मजबूत राहतात.
तळलेले पदार्थ टाळा ः तळलेले चिप्स खाण्याऐवजी थोड्याशा तुपात भाजलेले मखाणे, बदाम, अक्रोड किंवा खजूर खावेत. हे पदार्थ पोटही भरतात आणि शरीराला आवश्यक असलेले ‘गुड फॅट्स’ पुरवतात.
--------
महिलांनी आहाराबाबत जागरूक राहणे आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. उपवास करताना दिवसभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. पाणी, नारळपाणी, ताक किंवा फळांचे ताजे रस प्यायल्याने निर्जलीकरण टाळता येते आणि थकवा कमी होतो. नवरात्रीत सामान्यतः जास्त तळलेले किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. हरिदास शेंडे, वैद्यकीय अधिकारी, पालिका रुग्णालय, आकुर्डी
---------
उपवासात बऱ्याचदा साबूदाणा किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जातात. पण, हे पदार्थ पचण्यासाठी जड असतात. हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. आयुर्वेदानुसार दिवसातून दोन वेळा जेवणे शरीराच्या पचनक्रियेसाठी अत्यंत उत्तम मानले जाते.
- डॉ. प्रशांत खाडे, आहारतज्ज्ञ, आयुर्वेदाचार्य
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT