पिंपरी, ता. १० : आपण साप्ताहिकाचा पत्रकार असून स्पा सेंटर सुरू ठेवायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा बातम्या छापून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत १० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. रहाटणीतील जगताप डेअरी चौकातील साई कॉर्नर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अक्षय अरुण वाघमारे (वय ३५, रा. औंध रोड, पाडळेवस्ती, खडकी) असे आरोपीचे नाव आहे. ‘‘साप्ताहिक वंचित सामना’चा पत्रकार असल्याचा त्याचा दावा आहे. याबाबत स्पा सेंटर चालक साजिद मन्सूर पेंढारी यांनी शुक्रवारी पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. स्पा सेंटरबाबत डायल ११२ वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती देत मानसिक त्रास दिल्याचाही त्यांचा आरोप आहे.
तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित व्यक्ती वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून खंडणीची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने दोन पंचांसह सापळा रचून खंडणी स्वीकारताना वाघमारे याला पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाइल, ओळखपत्र आणि मोटार असा एकूण दोन लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.