पिंपरी, ता. १३ : ज्येष्ठ कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेने निगडी येथील शांताबाई शेळके सभागृहात ‘बकुळगंध संगीत संध्या’ कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये रसिकांना गीत-संगीत, साहित्यिक आठवणी आणि भावभावनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला.
उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे आणि उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.
गायक कलाकार डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, अविनाश पाठक, गीता सुतार, आणि रिचा राजन यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून मैफलीला रंगत आणली. कार्यक्रमाची सुरवात रिचा राजन यांनी सादर केलेल्या ‘गजानना श्री गणराया’ या मंगलगीताने झाली. तर, भाऊसाहेब भोईर यांनीही सहभाग घेऊन ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ हे गीत सादर करून रसिकांना भावधुंद विश्वात नेले. राजन लाखे यांनी शांताबाई शेळके यांच्याशी संबंधित आठवण सांगून शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता, साहित्यिक समृद्धी आणि त्यांच्या गीतांमागील भावविश्व उलगडले.
सूत्रसंचालन प्रियंका जोशी यांनी केले, तर कार्यवाह संजय जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. किरण जोशी, इला पवार, किशोर पाटील, किरण जोशी, नीलिमा फाटक, श्रीकांत जोशी, अशोक होनराव, संजय होनकळस, आनंद यंकरस यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.