पिंपरी-चिंचवड

भाडेदरावरून वाद; कोठे मागायची दाद?

CD

पिंपरी, ता. १४ : ॲपआधारित रिक्षा/कॅब सेवा पुरवणारे चालक आणि प्रवासी यांच्यात भाडे दरावरून वाद होत आहेत. याचे नवनवीन व्हिडिओ दररोज ‘व्हायरल’ होत आहेत. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) चालकांवर काहीच कारवाई होत नसल्याने असे प्रकार वाढत आहेत. दर कोणते लागू आहेत, याबाबत ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असून कारवाईबाबतही त्यांनी हात झटकले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा विस्तार वेगाने होत असताना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र आजही सक्षम झालेली नाही. ‘पीएमपी’ बसची अपुरी सेवा आणि रिक्षा चालकांची भाडे नाकारण्याची प्रवृत्ती यामुळे प्रवासी ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या ॲपआधारित कॅब सेवांवर अवलंबून आहेत. विशेषतः आयटी कर्मचारी आणि नोकरदार कॅब सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या कॅब सेवा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी आणि आर्थिक लुटीचे केंद्र झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मीटरचा हट्ट, ‘कॅन्सलेशन’चा खेळ
कॅब सेवेबाबत प्रवाशांचा अनुभव आणि प्रतिक्रिया संतापजनक आहेत. कॅब बुक केल्यानंतर अनेक कॅबचालक प्रवाशांना तत्काळ फोन करतात आणि ‘‘आम्ही ॲपवरील दराने येणार नाही, तर मीटरप्रमाणे भाडे आकारणार’’ असे सांगतात. ड्रायव्हरला आपल्या मनासारखे उत्तर मिळाले नाही किंवा प्रवाशाने नकार दिला, तर ते प्रवाशालाच राइड कॅन्सल करायला लावतात किंवा स्वतः गाडी जागेवरून हलवत नाहीत. या मीटरच्या आणि कॅन्सल करण्याच्या घोळामुळे ग्राहकाला नाइलाजाने राइड कॅन्सल करावी लागते. यामध्ये प्रवाशाचा वेळ वाया जातो. ट्रेन, फ्लाइट किंवा ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी निघालेले नागरिक या मनमानीमुळे मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत.

भाडेवाढ आणि प्रवाशांची लूट
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) कुल कॅब, वातानुकूलित टॅक्सीसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये भाडे निश्चित केले आहे. तर काळी-पिवळी टॅक्सीसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे निश्चित केले आहे. पण, चालक मीटरचा हट्ट धरून प्रवाशांची अडवणूक करत आहेत, असा आरोप होत आहे.

रिक्षा आणि कॅब चालकांना प्रवासी मिळवण्यासाठी ॲप पाहिजे. पण, ॲपवर दाखवल्याप्रमाणे पैसे नकोत. मीटरप्रमाणे पैशांची मागणी करतात. त्यांना काही बोलायला गेलो, तर प्रवाशांसोबत हुज्जत घालतात. एकत्र येऊन प्रवाशांना धमकावतात.
- अभिषेक कांबळे, प्रवासी

कॅब चालकांनी ॲपवर दाखवलेल्या दराप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारले पाहिजे. वाद घालणाऱ्या कॅब चालकांची तक्रार प्रवाशांनी थेट आरटीओकडे करावी.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ, पिंपरी चिंचवड

तीन अधिकाऱ्यांची तीन उत्तरे
१. ॲग्रीगेटर धोरण लागू नसल्यामुळे कॅबच्या भाडेदराबाबत स्पष्टता नाही. एकदा दर निश्‍चित झाले की प्रवासी आणि चालक यांच्यात वाद होणार नाहीत.’’
२. ॲग्रीगेटर धोरण लागू झाले आहे. मागणी कमी असलेल्या वेळेत देण्यात येणारी सुट आणि दर फेरीच्या २५ टक्के आणि मागणी असलेल्या वेळेत दर दीड पटीपेक्षा जास्त नसावेत.
३. ॲपवर दाखवलेल्या दराप्रमाणेच चालकांनी पैसे घेतले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : मेरठमधील 'ब्लू ड्रम' हत्याकांडात पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT