पिंपरी-चिंचवड

ना माहिती, ना नोंदी; सारीच अनागोंदी!

CD

बातमी अपडेट होणार आहे.
.
पिंपरी, ता. १५ : रावेतमध्ये मलनि:स्सारण वाहिनी फुटून ‘बोअरवेल’ अर्थात कूपनलिकेच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे बोअरवेलच्या पाण्याची नियमित तपासणी होते का, दूषितपणा आढळल्यास नागरिकांना कळविले जाते का आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाले आहेत.

महापालिकेकडे असलेल्या नोंदींनुसार शहरात १८ हजार ७७० कुपनलिका आणि ८३ विहिरी आहेत. पण, त्यापैकी कितींचे पाणी वापरण्यायोग्य आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडील नोंदींनुसार शहरातील २४ भागांत हे जलस्रोत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील एकूण तपशील असून, त्यातील महापालिकेच्या मालकीच्या जलस्रोतांचे स्वतंत्र वर्गीकरण आवश्यक आहे.
महापालिकेच्या २०२६ च्या पर्यावरण अहवालात सार्वजनिक बोअरवेलच्या पाणी देण्याच्या क्षमतेची आणि वार्षिक भूजल उपशाची माहिती उपलब्ध नसल्याची नोंद आहे. पर्यावरण अहवालात नवीन कूपनलिकांसाठी पावसाच्या पाण्याने पुनर्भरणाची अट नमूद आहे. प्रत्यक्ष किती बोअरवेलना मीटर आहेत आणि किती ठिकाणी पुनर्भरण व्यवस्था कार्यरत आहे, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा पर्यावरण अहवाल नावापुरताच ठरला आहे.

सर्वेक्षण झालेच नाही
शहरातील बोअरवेलचे २०२३ नंतर पुन्हा सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे आता किती बोअरवेल कार्यरत आहेत, किती कोरड्या पडल्या आणि किती पंपांच्या बिघाडामुळे बंद आहेत, याची अद्ययावत स्थिती स्पष्ट झालेली नाही. नोंद असलेल्या जलस्रोतांमधून प्रत्यक्ष किती पाणी मिळते, याचेही मोजमाप महत्त्वाचे आहे.

अहवालातील निष्कर्ष बोअरवेलचा नाही
महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या पर्यावरण अहवालात सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांतील प्रक्रियायुक्त सांडपाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार राखली जात असल्याचे नमूद आहे. मात्र, बोअरवेलच्या पाण्याचा निष्कर्ष नाही. त्यामुळे भूजलाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता तपासणी आवश्यक आहे.

पाणी दूषित आढळल्यास त्याचे कारण आणि देखभालीतील त्रुटी तपासून जबाबदारी निश्चित करण्यात येते. तक्रार मिळाल्यानंतर पाहणी, वापराबाबत सूचना, वाहिनीची दुरुस्ती आणि पाण्याची फेरतपासणी करण्यात येते. नव्याने शहरातील बोअरवेल्सचे सर्व्हेक्षण होणार करण्यात येणार आहे.
- महेश बरिदे, कार्यकारी अभियंता, महापालिका

परिसर आणि नोंदणीकृत बोअरवेल
- चिंचवड : ३,०७५
- पिंपळे गुरव : २,०९५
- सांगवीत : १,९३७
- रहाटणीत : १,९०५
- थेरगाव : १,५६५
- रावेत : ५१२

या नोंदी आवश्यक
- उद्याने, शाळा, रुग्णालये आणि महापालिका इमारतींतील बोअरवेलचा स्वतंत्र हिशेब नाही
- खोदकाम, पंप खरेदी, विद्युत जोडणी आणि दुरुस्तीवर किती खर्च झाला?
- दुरुस्तीनंतर किती जलस्रोत वापरात आले?
- शाळा व रुग्णालयांत बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी की अन्य कामांसाठी वापरले जाते?
- बोअरवेलची शेवटची तपासणी कधी झाली?

नागरिकांना पडलेले प्रश्न
- पाण्याच्या गुणवत्तेची खात्री कोणाची?
- सध्याच्या जलस्रोतांची स्थिती काय?
- या जलस्रोतांची तपासणी कधी करणार?
- आतापर्यंत झालेल्या खर्चाचा ताळमेळ का नाही?

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT