पिंपरी-चिंचवड

‘बीएएमएस’ विद्यार्थी निघाला अट्टल गुन्‍हेगार

CD

पिंपरी, ता. २६ : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ६६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. यापैकी एकजण सराईत असून, तो ‘बीएएमएस’च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव) असे आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली. तपासादरम्यान पोलिसांना संशयित बँक खात्‍याची माहिती मिळाली. त्‍यानुसार लोखंडेला चौकशीसाठी बोलावण्यात आले. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण, खंडणीच्या गुन्ह्यात तो सामील असल्याचे आढळले. त्‍याच्‍या खात्‍यात पाच लाख रुपयांची रक्‍कम होती. अधिक तपासात लातूरहून बाकलीकरला अटक झाली. त्‍याने सायबर गुन्ह्यांसाठी विविध बँक खाती उघडून गैरवापर केल्याचे आढळले. सस्टेनब्लॉक कन्स्ट्रक्शन व स्ट्रुनोव्हा अशा नावांनी त्याने कार्यालये उघडल्याचेही निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती.
---

अशी झाली ओळख
लोखंडे हा हिंजवडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. त्याची येरवडा कारागृहात बाकलीकरशी ओळख झाली होती. बाकलीकरने इतर आरोपींशी ओळख वाढवून ‘युनिव्हर्सिटी’ नावाने सर्व क्रमांक ‘सेव्ह’ केले. सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्यात त्याचा पुढाकार होता. जामिनावर बाहेर पडल्‍यानंतर तो इतरांच्या संपर्कात होता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT