पिंपरी, ता. ११ ः निगडीतील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वतीने ‘इन्स्पायर २०२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ मार्च दरम्यान होणाऱ्या परिषदेत ‘रिस्पॉन्सिबल बिझनेस इनोव्हेशन ः ड्रायव्हिंग चेंज फॉर सस्टेनेबल ग्लोबल फ्युचर’ या विषयावर देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थी चर्चा करतील .
परिषदेस उद्योगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पानसरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. परिषदेसाठी भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फिलिपिन्स, थायलंड, लेबनॉन व दुबई आदी देशांतील एकूण ५३८ लेखकांनी नोंदणी केली असून सुमारे २४० संशोधनपर लेख सादर केले जाणार आहेत. व्यवस्थापन, शाश्वत विकास, जबाबदार व्यवसाय नवोन्मेष आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. परिषदेमुळे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.