पिंपरी-चिंचवड

बेकायदेशीर वास्तव्य; तीन परदेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

CD

पिंपरी, ता. १४ : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या युगांडा देशातील तीन महिलांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने मारुंजी येथून ताब्यात घेतले. त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील हॅपी होम्स सोसायटीत काही परदेशी नागरिक बेकायदेशीर राहत असल्याची माहिती सहायक निरीक्षक राजश्री पावरा यांना मिळाली होती. या आधारे पथकाने सदनिकेवर छापा टाकला असता डोरेक अहैसब्वे, प्रोसी अंकुंडा आणि अमिना कातुसिमे (सर्व रा. युगांडा) या तीन महिला तेथे वास्तव्यास असल्याचे आढळले. कागदपत्रांच्या पडताळणीत डोरेक ही स्टुडंट व्हिसावर, तर प्रोसी आणि अमिना या मेडिकल व्हिसावर भारतात आल्याचे निष्पन्न झाले. या तिघींच्याही व्हिसाची मुदत संपली होती. दरम्यान, कोणत्याही घरमालकाने परदेशी नागरिकाला जागा दिल्यास २४ तासांत ''सी-फॉर्म'' भरणे बंधनकारक आहे. हा कायदेशीर नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त पाटील यांनी दिला आहे.

तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी ः तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भोसरी येथील सखूबाई गवळी गार्डन परिसरात १३ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. राहुल विनोद बनसोड (२६, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ अकोला) असे आरोपीचे नाव आहे. शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून लोखंडी तलवार बाळगून फिरताना पोलिसांच्या गस्ती पथकाने त्याला पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : मेरठमधील 'ब्लू ड्रम' हत्याकांडात पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT