पिंपरी-चिंचवड

जुन्या रागातून चुलत भावाला मारहाण

CD

पिंपरी : जुन्या रागातून चुलत भावाला सिमेंटचा गट्टू व रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी सद्दाम राजू पठाण (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शकील बहादूर पठाण (रा. अजमेरा, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फिर्यादीचा चुलत भाऊ असून, त्याने फिर्यादीला बेदम मारहाण केली.

गांजाप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या दाम्पत्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भोसरी एमआयडीसीतील गोडावून चौक येथे केली.
सरोज रामकृष्णप्रसाद सिंग व त्याची पत्नी वंदनादेवी सरोज सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी सरोज याच्याकडून पाच हजार सहाशे रुपयांचा गांजा जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा गांजा त्याला विक्रीसाठी त्याच्या पत्नीने आणून दिल्याचे सांगितले.

दारू अड्ड्यावर छापा
पिंपरी : मोशीतील लक्ष्मी चौक येथील दारू अड्ड्यावर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३८ हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी एका महिलेवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: रवींद्र एरंडेला ४ दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT