पिंपरी-चिंचवड

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

CD

कर्जच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक

पिंपरी : चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची पाच लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौंड) याच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अनिकेत कुमार अग्रवाल (रा. भोसलेनगर, गणेशखिंड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीला चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बाणेर येथील एका सदनिकेचा समझोता करारनामा करून त्याची मूळ प्रत आणि आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून पाच लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, कर्ज न मिळवून देता ही रक्कम परत न करता फसवणूक केली.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना देहूरोड येथे घडली.
या प्रकरणी वेदांत भुजबळ (रा. कोथरूड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालक अथर्व तापडिया (रा. सदाशिव पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारीने फिर्यादीच्या मोटारीला पाठीमागून धडक दिली.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT