निगडी, ता. ७ ः निगडी प्राधिकरण येथील पेठ क्र. २६ मध्ये अत्यंत कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता प्रसंगी नागरिकांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
पेठ क्र. २५ मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील सर्व रहिवाशांना दररोज पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. समस्या सोडविण्याऐवजी उद्धट वर्तन केले जाते. उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप रहिवासी माधव पाठक यांनी केला आहे. तसेच या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी केली आहे.