पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण

CD

पिंपरी, ता. ८ : ‘‘मी पिंपरी चिंचवड शहरात १५ वर्षांपासून राहतो. दुचाकी दुरुस्ती करतो. या शहरात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न होते. पण, किंमतीमुळे ते शक्य नव्हते. ‘पीएमआरडीए’च्या लॉटरीत पहिल्यांदाच अर्ज केला अन् माझा नंबरही लागला. माझ्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे,’’ अशी भावना शेषेराव रासवे यांनी व्यक्त केली. हे प्रातिनिधिक उदाहरण असले, तरी बुधवारी (ता.८) एक हजार २९ जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एक हजार २९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी पार पडली. स्वत:चे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जमीन व मालमत्ता विभाग सहआयुक्त पूनम मेहता आणि प्रशासन सहआयुक्त रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.
सकाळी ११ वाजता लॉटरीची सोडत जाहीर होणार होती. मात्र, अर्जदारांनी दहा वाजेपासून गर्दी केली. ज्यांना उपस्थित राहता आले नाही, त्यांना एसएमएसद्वारे यू-ट्यूब लिंक पाठवण्यात आली. प्रास्ताविक सहआयुक्त पूनम मेहता यांनी करून सोडत प्रक्रियेची माहिती दिली व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी पूनम बोराटे यांनी, तर उपायुक्त हिम्मत खराडे यांनी आभार मानले.


घरासाठी लॉटरी सोडत पारदर्शकपणे राबविण्यात आली. ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले, त्यांना कर्जप्रकरणे व इतर कार्यालयीन बाबींसाठी प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल. केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहू नये, याची काळजी घेतली जाईल.
 - डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, ‘पीएमआरडीए’

घरासाठी मी आतापर्यंत अनेकदा अर्ज केला. मात्र, यावेळी मला घर मिळाले याचा खूप आनंद होत आहे. आता कर्जाची प्रक्रिया करून लवकरात लवकर ताबा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
- अनिल साळुंखे, लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT