पिंपरी, ता. ७ ः सांगवी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवरील पुलाचे सुशोभीकरण करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यासाठी सुमारे २१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. महापालिका आर्थिक संकटात असताना सुशोभिकरणावर इतका खर्च का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मुळा नदीवरील पुलामुळे जुनी व नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपोडी, खडकी रेंजहिल्स, भोसलेनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढली आहे. या पुलाचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारून विद्युत रोषणाई केली आहे. या कामाचे उद्घाटन आणि पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ नामकरण महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. मात्र, पुलाच्या कामाचा खर्च सुमारे ३२ कोटी आणि सौंदर्यीकरणाचा खर्च सुमारे २१ कोटी झाला आहे. त्यामुळे सुशोभिकरणावर इतका खर्च करण्याची गरज होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगवी-बोपोडी पुलाची वाटचाल
- भूमिपूजन ः ५ जानेवारी २०२२ ः हस्ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप
- उद्घाटन ः १४ ऑक्टोबर २०२४ ः हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार
- सौंदर्यीकरण उद्घाटन ः ७ एप्रिल २०२४ ः हस्ते महापौर रवी लांडगे
दृष्टिक्षेपात पुलाचे काम
- लांबी ः ७६० मीटर
- कमानींची उंची ः २६ मीटर
- कमानींचे वजन ः ६५० टन
(सुशोभिकरणासाठी १० महिने पुल वाहतुकीस बंद होता)
पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे. त्यांना आधुनिक रूप देणे हे महापालिकेचे धोरण आहे. ‘सरकार शितोळे सेतू’ च्या सुशोभीकरणामुळे केवळ पुलाचा दर्जाच उंचावला नाही, तर शहराच्या सौंदर्यवृद्धीलाही चालना मिळाली आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येत असून भविष्यातही अशा प्रकल्पांवर भर दिला जाईल.
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड
शहरातील विद्यमान पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण व देखभाल यावर महापालिका विशेष भर देत आहे. पुलावरील सुशोभीकरण आणि रोषणाईमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.