पिंपरी-चिंचवड

आजीची नातवासोबत भिवसुळा गुहेची भ्रमंती

CD

निगडी, ता. ८ ः यमुनानगर येथील एका आजीने आपल्या नातवासह सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील भिवसुळा गुहेची भ्रमंती केली. या आजींनी याच नातवासोबत आतापर्यंत राज्यातील ७५ गडकिल्ले पायी सर केले आहेत.
शालेय परीक्षा संपून आता विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहे. राज्याच्या सह्याद्री खोऱ्यांतील गडकिल्ल्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत उत्तम रीतीने पोचवायचा असेल, तर गडकिल्ल्यांची सहल हा सर्वात सुंदर पर्याय असू शकतो. हे लक्षात घेऊन सेवानिवृत्त शिक्षिका महानंदा बर्गे (वय ६७) या आजीने आपल्या १५ वर्षाचा नातू चिराग याच्यासमवेत विविध गडकिल्ले पादाक्रांत केले आहेत. चिंचवड येथील फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबच्या मार्गदर्शनाखाली भिवसुळा गुहेची भ्रमंती आयोजित करण्यात आली.
बर्गे म्हणाल्या, ‘‘किल्ले हे पूर्वजांचा जिवंत इतिहास कथन करतात. त्यातून अनेक गोष्टींची प्रेरणा मिळते. गुहा, खोल दऱ्या, उंच पायऱ्या, काळ्या पाषाणातील कडे, सुळके, अप्रतिम निसर्गाचे सौंदर्य याचा अनुभूती प्रत्यक्ष घेण्यासारखीच आहे. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सहज उलगडा जातो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT