पिंपरी-चिंचवड

‘पीएमआरडीए’मध्येही आकाशचिन्हे परवाना विभाग

CD

पिंपरी, ता. ९ : होर्डिंग आणि आकाशचिन्हे परवानगी प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी व एकाच छताखाली सर्व परवानग्या देण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’मध्ये (पीएमआरडीए) एक स्वतंत्र ‘आकाशचिन्हे परवाना विभाग’ स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.९) प्रशासनाला सूचना दिल्या.

प्राधिकरण कार्यक्षेत्रातील होर्डिंग व्यावसायिकांची बैठक आकुर्डी येथील मुख्यालयात पार पडली. या वेळी होर्डिंगधारक संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक यांच्यासह विकास परवानगी विभाग संचालक अविनाश पाटील यांची उपस्थिती होती.
‘पीएमआरडीए’ हद्दीत यापुढे परिस्थितीत विनापरवानगी होर्डिंग्ज लावू दिली जाणार नाहीत. ज्यांच्याकडे परवानगी नाही, त्यांनी तत्काळ अर्ज करावेत; अन्यथा अनधिकृत होर्डिंग्ज हटवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगर आयुक्तांनी दिला. तसेच ज्या व्यावसायिकांना चलने जारी झाली आहेत, त्यांनी तातडीने चलनांचा भरणा करून आपली होर्डिंग्ज अधिकृत करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत; मात्र कोणत्याही परिस्थितीत अवैध किंवा प्रमाणापेक्षा मोठ्या होर्डिंगला मान्यता देऊ नये, अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी दिल्या.

परवानगीसाठी ऑनलाइन प्रणाली
- होर्डिंग परवानगीसाठी ‘पीएमआरडीए’च्या ऑनलाइन प्रणालीचे बैठकीत सादरीकरण
- अनावश्यक कागदपत्रांची अट वगळली. संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक प्रणालीद्वारे
- ज्यांना जुनी चलने मिळाली, त्यांची परवानगी प्रक्रिया पूर्ण केली जाईल; मात्र नवीन प्रकरणे या नव्या ऑनलाइन प्रणालीनुसारच हाताळली जातील
- प्रत्येक अधिकृत होर्डिंगवर आता क्यूआर कोड आणि परवाना क्रमांक बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT