पिंपरी-चिंचवड

बोगस उपसूचनांवर ‘भाजप’च्या स्वाक्षऱ्या

CD

पिंपरी, ता. १० ः स्थायी व सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ‘बोगस’ उपसूचनांद्वारे सुमारे ५२ कोटींपेक्षा अधिक रकमेचा ‘कथित’ अपहार झाल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्षांनी केला आहे. त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या संबंधित उपसूचनांवर असल्याने त्यांचीही चौकशी होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा २४ मार्च रोजी आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ ची शेवटची स्थायी समिती सभा ३० मार्च रोजी झाली. या सभांची मान्यता नसलेल्या सुमारे २० ‘बोगस’ उपसूचनांद्वारे साधारण ७० कामांच्या तरतुदी वाढ व घट करून ५२ कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांची बिले ठेकेदारांना दिली आहेत. यास मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन कारणीभूत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे. याप्रकरणी सर्व आरोप जैन यांनी फेटाळले असून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. विशेष म्हणजे या उपसूचनांवर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या असलेले सदस्य भाजपचे आहेत.

उपसूचनांवर स्वाक्षऱ्या
सूचक ः सागर गवळी, निखिल बोऱ्हाडे, कुंदा भिसे, श्याम जगताप, अर्चना कारंडे
अनुमोदक ः सोनाली गव्हाणे, विजय शिंदे, रविना आंघोळकर, सुजाता बोराटे, पल्लवी जगताप, योगिता नागरगोजे
(काही सूचक व अनुमोदकांच्या केवळ स्वाक्षऱ्या आहेत, नावे नाहीत)

उदाहरणार्थ कामे आणि रक्कम (वाढ व घट)
- मोशी शिवरस्ता विकसित करणे (७ कोटी ४० लाख वाढ)
- धर्मवीर संभाजी महाराज पुतळा परिसरात कामे करणे (३ कोटी ९२ लाख वाढ)
- स्थानिक संस्था कर परतावा (११ कोटी ३२ लाख घट)

उपसूचना दोन
- मोशी सीएमजी पंप ते उपबाजार रस्ता (२ कोटी वाढ)
- ड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य कृती आराखडा (२ कोटी घट)

उपसूचना तीन
- नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस डांबरीकरण (१ कोटी ५० लाख घट)
- त्रिवेणीनगर ते तळवडे रस्ता विकसित करणे (१ कोटी ५० लाख वाढ)

उपसूचना चार
- चिखली ते आळंदी रस्ता (६ कोटी ५० लाख वाढ)
- सीसीसी आणि पाणी देयके (अनुक्रमे ५ व १ कोटी ५० लाख घट)

उपसूचना पाच
- पिंपळे गुरवमधील रस्ते, पदपथ दुरुस्ती (४२ लाख वाढ)
- कासारवाडी, दापोडी, फुगेवाडीत डांबरीकरण (५२ लाख वाढ)
- संत तुकारामनगर, वल्लभनगर, कासारवाडी डांबरीकरण (६१ लाख वाढ)
- जलशुद्धीकरण केंद्र निगडी (१ कोटी ५५ लाख घट)

उपसूचना सहा
- निगडी ते पिंपरी अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम (६ कोटी ५० लाख वाढ)
- पाणीपुरवठा देयके एमआयडीसी (६ कोटी ५० लाख घट)

उपसूचना सात
- वाकड टिपटॉप हॉटेल ते अटलांटा सोसायटी रस्ता (२ कोटी ६५ लाख वाढ)
- कोयते वस्ती पुनावळे ते जांबे रस्ता (७० लाख वाढ)
- वडमुखवाडी ते चऱ्होली रस्ता (५० लाख वाढ)
- विकासनगरमधील रस्ते डांबरीकरण (९५ लाख घट)

अन्य महत्त्वाच्या तरतुदी
- महावितरण, महापारेषणची देयके देणे (५ कोटी ६६ लाख ४७ हजार ६२ रुपये घट)
- उद्यान व क्रीडा विभागाकडील वाढ व घट (७५ लाख ३१ हजार)
- सार्वजनिक सुरक्षितता, शाळा इमारती, स्थापत्य प्रकल्पांतर्गत विद्युत कामे
- मोरवाडीतील रस्त्याला अडथळा ठरणारे विजेचे खांब व वाहिन्या हटविणे
- ऊर्जा बचतीची उपकरणे नूतनीकरण व दुरुस्ती
- वाहतूक नियंत्रक दिवे बसविणे
- अमृत योजनेतील कामे
- पर्यावरण विषयक कामे
- किरकोळ देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठीही वाढ आणि घट
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT