पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा विचारपूर्वक वापर करावा

CD

निगडी, ता. २३ ः ‘विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा विचारपूर्वक वापर करावा. त्यातील सत्यता जाणून घ्यावी,’ असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच यांच्यातर्फे निगडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रवासीयांचा स्नेहमेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार शंकर जगताप, मनोज घोरपडे, अमित गोरखे, उमा खापरे, अश्विनी जगताप,
यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते.
निगडीमध्ये सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करून यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. याचे लवकरच उद्‍घाटन करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली.
शशिकांत शिंदे, शंकर जगताप, अश्विनी जगताप, घोरपडे, गोरखे, गोपीचंद जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. शिरीष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
तुम्हीही आमच्यात या
सातारा जिल्हावासीयांच्या वतीने मंत्री भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना व्यासपीठावर आमंत्रित केले. ‘तुम्हीही आमच्याकडे या,’ अशा त्यांच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, ‘‘तुम्ही तर एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच बोलवता आहात.’’ त्यावर मोठा हशा झाला.
---
विविध मानकरी
सातारा भूषण ः उद्योजक राजेंद्र शिंदे
पिंपरी चिंचवड भूषण ः हाडवैद्य विशाल मोरे
सांगली भूषण ः डॉ. सुहास गोडसे
कोल्हापूर भूषण ः विजय मंडलिक
सोलापूर भूषण ः दिनेश मोरे
समाजभूषण ः धनंजय वर्णेकर सर, डॉ. आकाश ठुबे, ॲड. मुकेश परदेशी
उद्योगरत्न ः अश्विनी सावंत, पंकज थोरात, प्रल्हाद लांडे-पाटील, बाबासाहेब भोसले, नवनाथ साळुंखे
---
फोटो
44383

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Pune News : पुण्यात आठ मतदारसंघांत मोठ्या फेरबदलाची शक्यता! तब्बल १४ लाख मतदार वगळणार

Marathi News Live Updates : जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती; ४० जण रुग्णालयात दाखल

Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

SCROLL FOR NEXT