पिंपरी-चिंचवड

वाहन चालक चाचणी गुरुवारी दुपारनंतर होणार

CD

पिंपरी, ता. ३ ः पोलिस शिपाई, चालक पदाच्या भरतीकरिता अर्जदारांसाठी पाच आणि सहा मार्च रोजी भोसरी येथील केंद्रीय रस्ते चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयडीटीआर) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी होणार आहे. त्यामुळे नियमित वाहन चालक परवाना चाचणी दुपारी १२ नंतर सुरू होईल. हे लक्षात घेऊन वाहन चालकांनी लवकर येऊन ‘आयडीटीआर’ मध्ये गर्दी करु नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओत दररोज शिकाऊ आणि नूतनीकरण असे दोन्ही मिळून सरासरी ४०० ते ४५० हून अधिक वाहन चालक परवाना चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज करतात. पक्के परवाने प्राप्त करण्याकरिता पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘आयडीटीआर’ येथे मोटारसायकल विथ गिअर, मोटारसायकल विदाऊट गिअर, ऑटो रिक्षा तसेच पुनर्चाचणी परीक्षा व मोटार चालविण्याची चाचणी परीक्षा घेतली जाते. पुणे पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील रिक्त पोलिस शिपाई, चालक पदांच्या जागांकरिता सकाळच्यावेळेत कौशल्य चाचणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT