पिंपरी-चिंचवड

उद्योगांच्या मदतीसाठी विशेष सुविधा केंद्र

CD

पिंपरी, ता. १४ : औद्योगिक विकासाला गती देण्यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे निराकरण करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी ‘पीएमआरडीए’तर्फे विशेष सुविधा केंद्र अर्थात ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. यामुळे औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विकास परवानगी, फायर एनओसी, बीपीएमएस प्रणालीतील अडचणी, शुल्क आकारणी, आवश्यक कागदपत्रे, झोनिंग ओपिनियन आणि विविध प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक करण्यासाठी बीपीएमएस प्रणालीद्वारेच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. शुल्काचा तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या आहेत. औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि सुविधांचा अभाव याकडे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

विशेष सुविधा कक्षाचा उद्देश
औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योजकांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे आणि परवानगी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक करणे हा केंद्राचा प्रमुख उद्देश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT