(जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
जेएसपीएमच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे येथे कॉग्निझंट फाउंडेशनच्या सहकार्याने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी सायबर सिक्युरिटी विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा झाली. सर्व शाखांतील अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी आणि बीसीएच्या ६७ विद्यार्थिनींची निवड झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना प्राधान्य दिली. आधुनिक सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. यात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण घेण्यात आले. तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थिनींना सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला. उदय सांगरे आणि रविश सैफी यांनी प्रशिक्षण दिले. संकुल संचालक डॉ. सुधीर भिलारे, प्राचार्य डॉ. अविनाश बडधे, अधिष्ठाता डॉ. सौरभ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला. अश्विनी बाविस्कर, समृद्धी कुलकर्णी यांनी संयोजन केले.
ज्युनिअर कुरुक्षेत्र हॅकाथॉन
(एमआयटी आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, आळंदी)
संस्थेच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे (आयआयसी) ‘ज्युनिअर कुरुक्षेत्र हॅकाथॉन’ उत्साहात झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या, शिक्षण, डिजिटल नवोपक्रम, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षितता तसेच मुक्त नवकल्पना अशा विविध विषयांवर नावीन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये साहित्य लाईन्स, इनोव्हेटर्स, कोड ब्लडेड, द इन्व्हेन्शन बॉईज, फायर ब्लेड्स, चॅप्टर झिरो, स्टार किनर, झिरो वेस्ट लॅब्स, एन्व्हायर्नमेंटल वॉरियर्स, द पायोनिअर्स, टेक इनोव्हेटर्स, व्हायब्रंट, ग्रोथ बडीज, ट्रायनोव्हा आणि नोव्हा लॅब्स या संघांचा समावेश होता. संस्थेचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, डॉ. अक्षदा कुलकर्णी, प्रा. अभिजित नेटके आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलचे संयोजक डॉ. संदीप ढवळे उपस्थित होते. समन्वयक प्रा. निकिता देवरे आणि प्रा. शीतल शेवकरी होते. उत्तम तेलगी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचे नावीन्य, व्यवहार्यता, समस्या निराकरण, संघभावना आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर परीक्षण झाले. यामुळे विद्यार्थ्यांना नवोन्मेष, सर्जनशील विचार, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ‘आजचे विद्यार्थी, उद्याचे नवोन्मेषक’ या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देणारा उपक्रम ठरला.
शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा
(मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, निगडी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज निगडी येथे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन क्लबचे उद्घाटन व शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात झाली. पर्यावरणप्रेमी विभा गोखले व विश्वास फडणीस यांच्या हस्ते क्लबचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः शाडू मातीच्या गणपती मूर्ती घडवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. प्राचार्या डॉ. पल्लवी बुलाख, समन्वयक डॉ. प्रसन्न चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वंशिता रिजवानी यांनी केले. प्रा. अश्विनी केंडे व प्रा. प्रणव मुळे यांनी संयोजन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.