पिंपरी, ता. १० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील बाजारपेठेत यंदा ''फ्युजन मोदक'' प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि फळांच्या फ्लेव्हर्सनी ग्राहकांना भुरळ घातली असून, महागाईमुळे मोदकांचे दर ३५ रुपयांपर्यंत पोहोचले तरी मागणीत मोठी वाढ झाली आहे.
पारंपरिक उकडीच्या आणि खव्याच्या मोदकांसोबतच यंदा चॉकलेट, मलाई, आणि आरोग्यप्रेमींसाठी शुगर-फ्री मोदक बाजारात ट्रेंड करत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राकडून गिफ्टिंगसाठी या फॅन्सी मोदकांच्या आकर्षक बॉक्सना मोठी पसंती मिळत आहे. तांदळाच्या पिठातील ११ कळ्यांच्या उकडीच्या मोदकाला गणेश चतुर्थीनिमित्त विशेष मागणी असून त्याचे बुकिंगही जोरात सुरू आहे.
चार वर्षांपूर्वी १० ते १५ रुपयांना मिळणारा उकडीचा मोदक यंदा ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. लहान मुलांसाठी डार्क चॉकलेट, ओरिओ आणि ब्राउनी मोदक आकर्षणाचे केंद्र आहेत, तर ज्येष्ठांसाठी अंजीर, खजूर आणि बदाम वापरलेले ड्रायफ्रूट मोदक उपलब्ध आहेत. रस मलाई, काजू कतली आणि गुलकंद मोदक यांसारख्या फ्युजन प्रकारांमुळे घरगुती महिला व मिठाई विक्रेत्यांच्या व्यवसायात मोठी वृद्धी झाली आहे.
असे आहेत दर (प्रति किलो/रुपयांत) :
उकडीचे मोदक : ३० ते ४० (प्रति नग)
तळणीचे मोदक : ५०० ते ५५०
केशरी मोदक : ७०० ते ८२०
मलई मोदक : ७२० ते ८२०
खोबरे मोदक : ६०० ते ६५०
चॉकलेट मोदक : ६०० ते ७००
जेली मोदक : ४५० ते ५००
काजू मोदक : १,००० ते १,२००
PNE26W48625
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.