पिंपरी-चिंचवड

संतांच्या विचारांचा प्रसार करावा

CD

पिंपरी, ता. १२ : ‘‘सर्वांनी संतांच्या विचारांचे अनुकरण करून आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्राचा प्रसार व प्रचार करावा,’’ असे प्रतिपादन सद्‍गुरु माऊली महाराज वाळुंजकर यांनी चिंचवड येथे केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे जिल्हा यांच्या वतीने चिंचवडगावातील गोखले हॉल येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सद्‍गुरु माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाग्यश्री भाग्यवंत यांची कीर्तन सेवा झाली. सोहळ्यात पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ महिला भजनी मंडळ, चिंचवड येथील जोगेश्वरी महिला भजनी मंडळ आणि जांबे येथील ग्रामस्थ भजनी मंडळाने सहभाग घेतला.
या वेळी माणच्या सरपंच अर्चना आढाव, किरण मगर, पांडुरंग गायकवाड, विजय गायकवाड, दिनेश शितोळे, गटविकास अधिकारी रेखा काळे, अरुण ढमाले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी गजानन वाशीमकर, संतोष गोरे, संपत ताटे, बळिराम मंडलिक, ॲड. सिद्धार्थ वाळुंजकर, अभिषेक मगर, अनिल कारेकर, शुभदा राऊत, अनिता मगर, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मंगल आढाव, प्रभाकर भालेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे व सरचिटणीस तेजस पंडित यांनी केले. उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अशोक मगर यांनी केले. आभार महिला शहराध्यक्षा रूपाली गोरे यांनी मानले. सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT