पिंपरी-चिंचवड

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

CD

डोक्यात दगड मारून ऐवज लुटला
पिंपरी : एका व्यावसायिकाला लाथा मारून खाली पाडल्यानंतर डोक्यात दगड मारून ऐवज लुटण्यात आला. पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील धावडेवस्ती येथील मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. याप्रकरणी ज्ञानेश्वर उत्तम मोहिते (रा. महादेवनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संकेत परमेश्वर वाघमारे (रा. आदर्शनगर कॉलनी, दिघी रोड, भोसरी) याला अटक केली असून त्याच्या अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी लघुशंकेसाठी मैदानात गेले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. आरोपींनी खिशातील मोबाइल व रोख रक्कम असा नऊ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटला.
--------------

तरुणाची साडेसहा लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर बाजार आणि आयपीओमधील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एका तरुणाची सहा लाख ५७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अविनाश मार्तंड गटे (रा. मुकाईनगर, हिंजवडी) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी गुंतवणुकीसाठी माहिती शोधत असताना आरोपींनी ग्रुपद्वारे संपर्क साधून चांगल्या फायद्याचे आमिष दाखवले. फिर्यादीला विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर रक्कम परत मागितली असता फिर्यादीला सेबी कारवाईची भीती दाखवून एकूण सहा लाख ५७ हजार ५०० रुपये उकळण्यात आले.
------------

बनावट कंपनीच्या माध्यमातून गंडा
पिंपरी : बनावट ब्रोकरेज कंपनीच्या माध्यमातून एका नागरिकाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. मोशी परिसरात हा प्रकार घडला.
याप्रकरणी जनार्दन बाळकृष्ण जगदाळे (रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आयुष पटेल, निरज मित्रा, अनुकभाई पटेल (सर्व रा. राजकोट, गुजरात) व इतरांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादीशी ऑनलाइन संपर्क साधून शिवालिका ब्रोकरेज कंपनीचे एजंट असल्याचे सांगून ही कंपनी सेबी नोंदणीकृत असल्याचे भासवले. शेअर्समध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून डिमॅट खात्यात खोटा नफा दाखवत एक कोटी सहा लाख ७५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले व रक्कम परत न देता फसवणूक केली.
---------------------

वाहतूक पोलिसाच्या करंगळीचा चावा
पिंपरी : मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला एकाने चावा घेतला. ही घटना दिघी येथील अलंकापुरम चौकात घडली. अनिकेत महेंद्र तिडके (रा. लांडेवाडी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई वैभव गोरख काकडे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत भांडण करून गोंधळ घालत होता. दरम्यान, फिर्यादी वाद सोडवण्यासाठी तेथे गेले असता आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला जोरात चावा घेऊन दुखापत केली.
--- -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT