पिंपरी-चिंचवड

सायबर सुरक्षेबाबत चिंचवडमध्ये जनजागृती

CD

पिंपरी, ता. १८ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालय ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबवीत आहे. त्याअंतर्गत चिंचवडमधील नवतरुण मंडळ भाजी मार्केट आणि गांधी पेठ तालीम मित्र मंडळ येथे सायबर पोलिस स्नेहल तिताडे, नारायणी पाटील आणि संगीता पुरी यांनी नागरिकांशी संवाद साधला. सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने जनजागृती अभियान सुरू केले आहे. २४ सप्टेंबर रोजी समारोप होईल. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. सायबर फसवणुकीसाठी गुन्हेगारांकडून विविध प्रकारच्या आमिषांचा वापर केला जातो.

सायबर पोलिसांचे आवाहन
- अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश, फोन घेऊ नये; संशयास्पद लिंक उघडू नये
- बनावट संकेतस्थळे, आर्थिक व्यवहार यांच्याशी संबंधित आमिषांना बळी पडू नये
- कोणतीही वैयक्तिक, बँकिंग किंवा गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये
- अनोळखी ॲप किंवा फाइल मोबाइलमध्ये डाउनलोड करू नये
- सोशल मीडिया खात्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा सुविधा सुरू ठेवाव्यात
- अनोळखी व्यक्तींच्या संदेशांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी
- ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी

सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीचा आणि ‘लोकसंवाद’च्या व्यासपीठाचा उपयोग करून नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश थेट पोहोचविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

SCROLL FOR NEXT