पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

रोहित्राखाली कचऱ्याचा ढीग; आगीचा धोका
निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७/अ, लालबहादूर शास्त्रीनगर येथील क्रांतीनगर चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर सुकलेला पालापाचोळा, लाकडे व कचरा साचलेला आहे. विशेष म्हणजे हा कचरा विद्युत रोहित्राखाली पडलेला असल्याने संभाव्य आगीचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी आग लागल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
- सिराज शेख, प्राधिकरण

00542

दुभाजकाजवळील खड्ड्यामुळे अपघातांचा धोका
पिंपरी गावातून जुना काटे-पिंपळे रोड मार्गे पिंपळे सौदागर पुलाकडे जाताना मुख्य ठिकाणी दुभाजकाच्या शेजारी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन हा खड्डा बुजवावा.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव

00541

बेशिस्त थांब्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. एम्पायर इस्टेट व प्रिमिअर प्लाझा, चिंचवड परिसरात काही ट्रॅव्हल्स बसचालकांकडून प्रवासी चढ-उतारासाठी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून रस्त्यातच वाहने उभी केली जात आहेत. बस अचानक थांबविणे, हात दाखवून प्रवासी चढविणे-उतरणे यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून वाहतुकीची कोंडीही होत आहे. वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल तसेच पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समतल विलगक परिसरातही पाहायला मिळत आहे.
- सचिन ताम्हाणे, चिंचवड
00540


सांगवी फाट्यावर मार्गदर्शक फलक लावावा
सांगवी फाटा येथील सांगवीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या सुरुवातीस पूर्वी कमान पद्धतीचा मोठा मार्गदर्शक फलक होता, जो आता नाही. नागरिकांच्या सोयीसाठी हा फलक पुन्हा बसवावा. नवीन फलकावर “सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी” अशा गावांच्या नावांचा उल्लेख असावा, ज्यामुळे या भागात प्रथमच येणाऱ्यांना मार्गदर्शन मिळेल.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
00544


अहिंसा चौकातील खड्डे अजून बुजवले नाही
अहिंसा चौक, चिंचवड येथे एका महिन्यापूर्वी केबल कामासाठी रस्त्यावर खड्डे खोदले गेले होते, परंतु अद्याप ते बुजवलेले नाहीत. या ठिकाणी मुरूम, माती, डांबर आणि केबल पसरलेली आहेत, जी वाहतुकीसाठी धोका निर्माण करत आहेत. मुख्य चौकातील गर्दीच्या भागातही खड्डे खोदले गेले असून, त्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी.

- मधुकर कांबळे, चिंचवड
00543

भाजी मंडईजवळ कचऱ्याचा ढीग
नवी सांगवी येथील भाजी मंडईजवळील पदपथावर मोठा कचऱ्याचा ढीग साचला आहे. या कचऱ्यामुळे शेजारील रहिवासी इमारतींना दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव होत आहे. नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार केल्या तरी महापालिकेने अद्याप दखल घेतलेली नाही.
- मनोज पवार, पवारनगर जुनी सांगवी
00546

संत निरंकारी भवन पईरिसरात सुधारणा आवश्यक
निगडी नाका येथील संत निरंकारी सत्संग भवन परिसरात उपाययोजनांची गरज आहे. येथील परिस्थिती अशी आहे की, दुर्गंधी, विस्कळीत झालेले ब्लॉक आणि वाया जाणारे पाणी आढळत आहे, ज्यामुळे परिसर अस्वच्छ आणि रहिवाशांसाठी त्रासदायक बनला आहे. त्यामुळे संबंधित महापालिका विभागाने तातडीने सुधारणा करावी.

- रवि जोशी, निगडी
00545

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी! पुण्यात घटस्फोटासाठी चक्क पत्नीने दिली पतीला पोटगी, नेमकं प्रकरण काय?

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

SCROLL FOR NEXT