पिंपरी-चिंचवड

वाहन योग्यता प्रमाणपत्राची नोंदणी प्रक्रिया बंद

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील स्वयंचलित चाचणी केंद्रवगळता राज्यातील इतर स्वयंचलित केंद्र अजूनही सुरू झालेली नाहीत. तर, पिंपरी चिंचवडसह ११ आरटीओ कार्यालयांतील योग्यता प्रमाणपत्रांची जुनी नोंदणी प्रक्रिया (संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट) बंद करण्यात आली आहे. त्यामुळे धोकादायक वाहने रस्त्यांवर धावत असून महसूलही बुडतो आहे. वाहनचालक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी तयार आहेत, मात्र प्रक्रियाच ठप्प झाल्याचे चित्र आहे.

वाहनांचे अपघात कमी करणे आणि त्यांची अचूक तपासणी करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने राज्यात स्वयंचलित चाचणी केंद्र उभारण्याची घोषणा केली. परिवहन विभागाने पिंपरी चिंचवडसह राज्यातील ५२ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतील स्वयंचलित चाचणी केंद्र प्रकल्पांना मंजुरी दिली होती. २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून तीन खासगी कंपन्यांना काम दिले. वाहनांच्या सर्व तपासण्या स्वयंचलित यंत्रांद्वारे होणे अपेक्षित होते. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकवगळता अन्य केंद्रांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मानवी चाचणीच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम सुरू होते. पण, रस्ते व वाहतूक मंत्रालयाने ते एक फेब्रुवारीपासून बंद केले होते. वाहतूक संघटनांच्या मागणीनंतर महिनाभराची मुदतवाढ दिली. आता एक मार्चपासून अपॉइंटमेंट पुन्हा बंद झाल्या आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नोंदणीसाठी वाहनचालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत. दरम्यान, संकेतस्थळावरच नोंदणी होत नसल्याने अधिकारीही हतबल झाले आहेत.

वाहनचालकांना भुर्दंड
रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक इत्यादी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास (पासिंग) विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१७ मध्ये घेतला. या बाबत मुंबई बस असोसिएशन आणि पुण्यातील रिक्षा संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. १८ मे २०२४ पर्यंत निर्णयाला स्थगिती होती. त्यावरील स्थगिती उठवल्याने राज्यात निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार पासिंग उशिरा केल्यास दंड आकारला जात आहे. आता अपॉइंटमेंटच बंद असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

स्वयंचलित केंद्रांचे काम पूर्ण झाले नसताना सक्ती का? ११ ठिकाणची नोंदणी बंद करून वाहन चालकांना वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे. परिवहन विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका वाहनचालकांना बसत आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना

अपॉइंटमेंटची मुदत आणखी महिनाभर वाढवून घेण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाला पाठवला आहे.
- भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

Sharad Pawar: मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री… शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास; उमेदवारीनंतर भावनिक पोस्ट लिहिली

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

SCROLL FOR NEXT