पिंपरी, ता. ४ ः पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्यावतीने थेरगाव येथे १२ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेला बुधवारी सुरुवात झाली. यजमान व्हेरॉक-वेंगसरकर आणि क्रिक नाईन संघांनी विजयी सलामी दिली. कौस्तुभ पटाले, कनिष्क गोन यांनी अप्रतिम शतके झळकाविली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी रणजीपटू युवराज कदम यांच्या हस्ते झाले. अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, भूषण सूर्यवंशी, राहुल वेंगसरकर, चिंतामणी वैद्य आणि डॉ.विजय पाटील यावेळी उपस्थित होते.
पहिल्या साखळी सामन्यात यजमान व्हेरॉक - वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने दीपक सोलंकी क्रिकेट अकादमीवर नऊ विकेट राखून सहज मात केली. संघाचा कर्णधार प्रिन्स कलाटे याने सुरेख ५७ धावांची नाबाद खेळी केली. त्यालाच सामनावीराचा बहुमान मिळाला.
दुसऱ्या सामन्यात क्रिक नाईन अकादमीने क्रिक फायटर अकादमीवर ३ विकेट राखून विजय मिळविला. यामध्ये क्रिकेट फायटरचा सलामीवीर कौस्तुभ पटाले याने ९१ चेंडूंत शानदार १२९ धावा केल्या. मात्र, प्रतिस्पर्धी क्रिक नाईनच्या कनिष्क गोन (११०), समक्ष पाथरीकर (६०) यांनीही चांगला खेळ केला. कनिष्क सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
दिलीप सोलंकी क्रिकेट अकादमी ः ३२.३ षटकांत ७ बाद १४१ - हर्ष देशमुख ७१, मितेश शिंदे ४० (प्रत्युष उघाडे २-१२) पराभूत वि. व्हेरॉक-वेंगसरकर ः १५ षटकांत १ बाद १४३ - प्रिन्स कलाटे नाबाद ५७, सूर्यनारायण वेंकटेश्वरन ५२.
क्रिक फाइटर्स ः ३४.५ षटकांत सर्वबाद २५० ः कौस्तुभ पटाले १२९, शावेज पठाण ७० (युवान बागड २-५९, अझलन चौधरी २-२५) पराभूत वि. क्रिक नाईन ः ३४.५ षटकांत ७ बाद २५३ - कनिष्क गोन ११०, समक्ष पाथरीकर ६० (वीरेन राठोड ३-३६, शावेज पठाण २-४०)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.