पिंपरी-चिंचवड

प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा करा

CD

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी चिंचवड शहरात धुळीचे प्रमाण वाढू नये, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम सुरक्षा तपासणीसाठी दोन विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील मोठ्या कामांची प्रगती आणि सुरक्षिततेची नियमित देखरेख करावी, प्रदूषणमुक्त शहरासाठी कृती आराखडा तयार करावा, असे आदेश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिले.
शहरातील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. शहरातील मुळा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणासह विविध कारणांनी होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याबाबतही सुचविले आहेत. या वृत्तमालिकेचे पडसाद बुधवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही उमटले.
महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘इन्कम जनरेशन’ आणि ‘प्रदूषण नियंत्रण’ या दोन सूत्रांवर भर देण्यावर स्थायी समिती सभेत चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे होते. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणीही प्रदूषण वाढत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असा आदेश बारणे यांनी दिला.

बांधकामांबाबत चर्चा आणि आदेश
- बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचा परिसर किमान ३० फूट उंच पत्रे लावून बंदिस्त करावा. यामुळे धुळ पसरणार नाही
- बांधकामाच्या ठिकाणी हिरवी जाळी लावावी, त्यामुळे धुळीचा त्रास नागरिकांना होणार नाही
- बांधकामाचा राडारोडा व साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना कापडाने आच्छादले पाहिजे, यामुळे धुळ उडणार नाही
- बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे
---

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT