पिंपरी-चिंचवड

भाजपचे सात स्वीकृत सदस्य ठरेनात

CD

पिंपरी, ता. ४ ः महापालिकेतील संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन सदस्य नियुक्त करायचे आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ बुधवारी (ता. ४) दुपारी तीन ते पाच अशी होती. या कालावधीत राष्ट्रवादीने तीन सदस्यांचे अर्ज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिले. मात्र, इच्छुकांची आणि त्यांची शिफारस करणाऱ्या कारभाऱ्यांची संख्या जास्त असल्याने भाजपमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे स्वीकृतसाठी मुदतीत अर्ज दाखल होऊ शकले नाहीत.
त्यासाठी मुदतवाढ देण्याची आणि एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्याची मागणी भाजपने आयुक्तांकडे केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी (नामनिर्देशित) नियुक्ती करणे आवश्यक असते. मात्र, राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांनाच ‘सामाजिक’ दाखवून संधी दिली जाते. त्यासाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या १३० पेक्षा अधिक आहे. त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय कोणाला संधी द्यायची? महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी द्यायची की नाही? निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यायची की निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात आलेल्याची वर्णी लावायची? याबाबत एकमत होऊ शकले नाही. शिवाय, शहरातील कारभारी चार आमदार, पक्षनेते, शहराध्यक्ष यापैकी नेमकी कोणाची शिफारस मान्य करायची? या पेचातून नावे निश्चित होऊ शकली नाहीत, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

१२.८ मागे एक स्वीकृत
पिंपरी चिंचवड महापालिकेत पूर्वी नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांची संख्या पाच हाेती. राज्य शासनाच्या २०२३ च्या आदेशानुसार दहा नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार १२८ नगरसेवकांसाठी १० म्हणजेच १२.८ नगरसेवकांमागे एक नामनिर्देशित सदस्य अर्थात मतांचा काेटा निश्चित आहे. त्यानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादीचे तीन स्वीकृत सदस्य असतील.

निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी
स्वीकृत सदस्यपदी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी. महापालिका निवडणुकीत ज्यांना तिकीट दिले, पण पराभूत झाले त्यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना संधी देऊ नये. यामध्ये आई-वडील, भाऊ-बहीण, पती किंवा पत्नी, मुलगा, मुलगी यांपैकी कोणालाही संधी देऊ नये. तसेच, माजी नगरसेवक, शासकीय पदे उपभोगलेले, अन्य पक्षातून आपल्या पक्षात आलेले किंवा अन्य समित्यांवर पद उपभोगलेल्यांऐवजी निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वीकृतपदी संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांसमवेत बैठक
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजपचे सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते (विरोधी पक्षनेते) भाऊसाहेब भोईर यांची स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत २६ फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती. त्यानुसार दोन मार्च रोजी अर्ज दाखल करण्याचे ठरले होते. नंतर बुधवारपर्यंत (ता. ४) मुदतवाढ दिली होती. दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी वेळ होती.

भाजप पक्षनेत्यांचे पत्र
आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीत राष्ट्रवादीने तिघांचे अर्ज दाखल केले. मात्र, सत्ताधारी भाजपची नावे निश्चित झाली नाहीत. सायंकाळी पाचच्या सभागृह नेते प्रशांत शितोळे आयुक्त दालनात आले. स्वीकृत सदस्यपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी अपरिहार्य कारणास्तव मुदतवाढ मिळावी, एप्रिल महिन्यातील सभेसमोर नियुक्तीचा प्रस्ताव ठेवावा असे पत्र दिले.

सावळे, जगताप, शेख
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फजल शेख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी होऊन ते वैध ठरले आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. निवडणूक काळात सावळे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्या आहेत. प्रभाग आठ इंद्रायणीनगरमधून त्यांचा पराभव झाला आहे. २०१७ मध्ये जगताप भाजपचे तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला होता. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष शेख हे राष्‍ट्रवादीचे शहरा कार्याध्यक्ष आहेत.
--
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारधारेने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. आमच्या तीन स्वीकृत सदस्यांच्या नावावर उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
- भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, महापालिका
---

स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांची यादी प्रदेश नेत्यांकडे पाठवली आहे. त्यांच्याकडून अद्याप अंतिम यादी आलेली नाही. त्यामुळे बुधवारी स्वीकृत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यासाठी आयुक्तांकडे मुदतवाढ मागितली आहे.
- प्रशांत शितोळे, पक्षनेते, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT