पिंपरी, ता. ४ ः भरधाव कारने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मंगळवारी (ता. ३) सकाळी १० वाजेच्या सुमारास बधलवाडी ते नवलाख उंबरे जाणाऱ्या रोडवर ह्युंडाई ग्लोविज कंपनीच्या गोदामाजवळ ही दुर्घटना घडली. चंद्रकांत शिवाजी हेमनार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर शंकर लोहार (वय २९, रा. ताथवडे, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मोटार चालक अविनाश कैलास ससाणे (रा. वेल्हावले, खेड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बुधवारी त्याला अटक केली आहे. फिर्यादी सिद्धेश्वर आणि मित्र चंद्रकांत इलेक्ट्रिक स्कूटरवरून कामावर जात होते. सिद्धेश्वर दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या स्विफ्ट मोटारीच्या चालकाने रस्त्यावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात फिर्यादी जखमी झाले असून त्यांचा मित्र चंद्रकांत हेमनार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.