पिंपरी-चिंचवड

तुकोबारायांच्या नामघोषात देहूनगरी तल्लीन

CD

मुकुंद परंडवाल : सकाळ वृत्तसेवा
देहू, ता. ५ : संत तुकाराम महाराज यांचा ३७८ वा बीज सोहळा इंद्रायणी नदीच्या तीरावर मोठ्या भक्तिभाव, उत्साह आणि परंपरेनुसार साजरा झाला. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘‘तुकाराम...तुकाराम’’ या अखंड नामघोषात गुरुवारी (ता.५) अवघी देहूनगरी दुमदुमली. वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.

सकळिकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥
रूप दाखवीं रे आतां । सहस्रभुजांच्या मंडिता ॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥
संत तुकाराम महाराज यांच्या उपरोक्त अभंगातील ओव्यांप्रमाणे भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा सदेह वैकुंठगमन सोहळा ‘याचि डोळां’ अनुभवला.


देऊळवाड्यात काकडारती
बीज सोहळ्याच्या दिवशी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सपत्नीक विठ्ठलरखुमाईची महापूजा केली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. तर, पहाटे साडेपाच वाजता सदेह वैकुंठ गमनस्थान मंदिरात संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची महापूजा विश्वस्त उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुका सकाळी दहा वाजता शेजघरातून मुख्य विठ्ठलरखुमाई मंदिरात आणण्यात आल्या. पाद्यपूजेनंतर भजनी मंडपात फुलांनी सजवलेल्या पालखीत या पादुका ठेवण्यात आल्या. ‘‘रूप पाहता लोचणी’’, ‘‘राहू आता हेचि ध्यान’’,‘‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’’ हे अभंग झाले.

वैकुंठगमन स्थान मंदिराकडे प्रस्थान
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखीने वैकुंठ गमनस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीपुढे सनई-चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. रस्त्यावर दुतर्फा भाविक दर्शनाठी उभे होते. यानंतर वैकुंठ गमनस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब महाराज मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील
‘‘घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं ।
मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ।।
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनीं ।
भाग्य तरी ऋणी देव ऐसा ।।
या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी साडेबाराची वेळ जवळ येऊ लागली, तशी ‘‘तुकाराम तुकाराम’’ नामाचा गजर सुरू झाला. भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठ गमनस्थान मंदिरात संस्थानचे विश्वस्त गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, अपर तहसीलदार जयराज देशमुख, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


PNE26W00918, DUH26B01377, PNE26W00967, PNE26W00915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT