पिंपरी, ता.५ ः प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सेवा वर्गीकरण होऊन तीन वर्षे पूर्ण झालेल्या ३०१ शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्रांची तात्पुरती यादी महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास १० मार्चपर्यंत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये समक्ष यावे, अशा सूचना महापालिकेने शिक्षकांना केल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने ही तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे. सेवापुस्तकात नोंदणी आणि विहित अटींच्या पूर्ततेनंतरच स्थायित्व प्रमाणपत्र दिले जाते. पात्र कर्मचारी, त्यांचे सेवापुस्तक आणि स्थायित्वाच्या अटींच्या आधारे ही यादी तयार करण्यात येते. पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी यादीचा उद्देश असतो. ११ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार शाळेतील शिक्षकांचे विहित नमुन्यातील अर्ज, सेवा पुस्तकाची पहिले व रुजू झालेल्या पानाची छायांकित प्रत, मूळ नियुक्ती आदेश (जिल्हा परिषद करिता), महापालिका सेवा वर्गीकरण आदेश, महापालिका नियुक्ती आदेश मागविण्यात आले होते. शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्रांच्या यादीमध्ये काही दुरुस्ती असतील त्या दुरुस्ती करून अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. स्थायित्व प्रमाणपत्रावरील दुरुस्ती करावयाची राहिल्यास संबंधित शिक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. याची संबंधित शिक्षक यांनी नोंद घेण्यात यावी, असे आदेश प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.