पिंपरी-चिंचवड

सोनकांबळे, गायकवाडला बालशाहीर पुरस्कार प्रदान

CD

पिंपरी, ता.७ ः संत तुकाराम महाराज बीज व शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र शाहीर परिषद, निगडी व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंपरी येथे बालशाहीर अनिकेत सोनकांबळे, असद शेख, अथर्व गायकवाड, महिला शाहीर नियती खराडे व विशेष वादक पुरस्कार नमन कांबळे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
संत तुकारामनगरमधील संत तुकाराम महाराज मंदिरात हा कार्यक्रम झाला. उद्योजक दीनानाथ जोशी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या प्रचिती भीषणूरकर, हरीभाऊ कळमकर, माणिक अहेरराव, शाहीर सुरेश सूर्यवंशी, शाहीर घनशाम कुदळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुरस्कार प्राप्त बालशाहीर अथर्व गायकवाड याने बाजीप्रभू देशपांडे, बालशाहीर अनिकेत सोनकांबळे याने शिवरायांचा न्याय, बालशाहीर असद शेख याने महाराष्ट्राचा पोवाडा, शाहीर नियती खराडे यांनी शिवरायांचा न्याय निवाडा यांचा पोवाडा सादर करून रसिकांची दाद मिळवली. शाहीर हर्षदा कुदळे यानी शिवजन्माचा पोवाडा सादर केला. वादक विशेष पुरस्कारार्थी नमन कांबळे यांनी ढोलकी वादन करून सर्वांची मने जिंकली. शाहीर प्रकाश ढवळे यांनी प्रास्ताविक केले. कीर्ती मराठे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रचिती भिषणूरकर यांनी आभार मानले. शाहीर लीना देशपांडे, शाहीर स्मिता बांदिवडेकर, शाहीर उज्ज्वला जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT