पिंपरी-चिंचवड

प्रदूषणमुक्त शहरासाठी कृती आराखडा करावा

CD

पिंपरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांत हवा, जल आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवत ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्त मालिकेद्वारे सद्यस्थिती मांडली. यातून पर्यावरणाप्रती प्रशासकीय अनास्थादेखील समोर आली. या पार्श्वभूमीवर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडत ‘सकाळ’च्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच ‘‘प्रदूषणमुक्त शहरासाठी प्रशासनाने कृती आराखडा करावा’’, ‘‘नागरिकांनी पर्यावरण संवर्धनात पुढाकार घ्यावा,’’ अशा सूचना मांडल्या आहेत.


मी ‘सकाळ’ वर्तमानपत्राचा नियमित वाचक आहे. ‘सकाळ’ने शहरातील हवा प्रदूषणाबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेमुळे पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्यात पर्यावरणविषयक खूप जागृती झाली आहे. प्रदूषणमुक्त शहरासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
- सुखदेव म्हस्के, रुपीनगर

ताथवडे परिसरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकामांचे सिमेंट हवेत उडत असते. यामुळे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे. श्वास घेणेदेखील कठीण झाले आहे. हे बांधकाम करणारे नियम पाळत नाहीत.
- उमा पवार, ताथवडे

चिखली, जल शुद्धीकरण केंद्र परिसरात कंपनीतील टाकाऊ साहित्य इंद्रायणी नदीलगत रात्री किंवा मध्यरात्री आणून टाकले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे हवा प्रदूषण होत आहे. यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांची आग होते आणि श्वासही गुदमरतो. हा प्रकार मागील बारा वर्षांपासून सुरू आहे.
- नीलेश बोराटे, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT