पिंपरी-चिंचवड

संत एकनाथ षष्ठीनिमित्त आकुर्डीत हरिनाम सप्ताह

CD

पिंपरी, ता. ७ : संत परंपरेची भक्तीमय परंपरा जपणारा शांतीब्रम्ह संत एकनाथ षष्ठीनिमित्त आकुर्डीतील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्‍याचे आयोजन केले आहे. विठ्ठलवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिरात ९ ते १७ मार्च या कालावधीत विविध कीर्तनाचा भक्तीमय सोहळा रंगणार आहे.
सप्ताहाचे व्यासपीठ चालक परमेश्वर महाराज फपाळ (आळंदी) असून विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात ९ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत उद्धव महाराज कोळपकर (चिंचवड) यांच्या कीर्तनाने होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ८ ते १० या वेळेत अशोक महाराज जाधव (नारायणगाव) यांचे कीर्तन होईल. दुसऱ्या दिवशी (ता.१०)समाधान महाराज शर्मा (केज, बीड), बुधवारी (ता. ११) जयेश महाराज भाग्यवंत (डोंबिवली), गुरुवारी (ता.१२) संतवीर बंडातात्या महाराज कराडकर, शुक्रवारी (ता.१३) महंत अमृताश्रम महाराज जोशी (बीड), शनिवारी (ता. १४) अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), रविवारी (ता. १५) विश्वनाथ महाराज वारींगे, (कोकणरत्न), सोमवारी (ता. १६) योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांची कीर्तने होणार आहेत. या सप्ताहाची सांगता १७ मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत काल्याच्या कीर्तनाने होणार असून, पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

Dhanashree Ahire : शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली आयपीएस; धनश्री अहिरेची प्रेरणादायी यशोगाथा

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

SCROLL FOR NEXT