पिंपरी, ता. ७ : चिंचवडमधील ऑटो क्लस्टर सभागृहात महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इएल माईंडस्पार्क तर्फे शैक्षणिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक अनुकूल शिक्षण पद्धती या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र पार पडले.
महापौर रवि लांडगे, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, समन्वय अधिकारी सुनीता गीते यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या २० शाळांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी सहभागी झालेते. याशिवाय सुमारे ४० मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या प्रसंगी इएल माईंडस्पार्क तर्फे प्रकल्प व्यवस्थापक नमन कुमार तसेच साहाय्यक प्रशिक्षण व्यवस्थापक रीता दाक्षिणी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी माईंडस्पार्क या वैयक्तिक अनुकूल शिक्षण सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
---
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक आहे. माईंडस्पार्क सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना शिकण्याच्या पातळीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी केल्यास महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण मिळण्यास निश्चितच मदत होईल.
- रवि लांडगे, महापौर
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर करणे काळाची गरज आहे. वैयक्तिक अनुकूल शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आहे.
- रविना अंगोळकर, सभापती, शिक्षण समिती
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.