पिंपरी, ता.७ : महापालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी या उद्देशाने महापौर वैद्यकीय आर्थिक साहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या अंतर्गत गरजू रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे उपचारासाठी आवश्यक असलेला आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना वेळेवर उपचार घेणे शक्य होणार आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती अचूक असणे आवश्यक असून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच आर्थिक साहाय्य मंजूर केले जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाईल.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
- रुग्ण किंवा कुटुंबातील सदस्यांनी महापौर कार्यालयात अर्ज सादर करावा
- अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत ः रुग्णाचे आधारकार्ड (सत्यप्रत), रेशनकार्डाची प्रत
- तहसीलदार कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला
- स्थानिक नगरसेवकांचे शिफारसपत्र
- रुग्णालयाकडून देण्यात आलेले उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (डॉक्टरांच्या सही व शिक्क्यासह)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.